Posts

Showing posts from May, 2020

Passion for Excellence

Image

मी पृथ्वी बोलते ........

मी पृथ्वी बोलते ........  का रे , का सर्वांनी अशी वेळ आणलीत माझ्यावर आज ? ते विज्ञान वगैरे बाजूला राहू द्या. जेव्हापासून जीवसृष्टीनं जन्म घेतला माझ्या अंगणात आणि वृक्ष वल्लरी उमलायला लागल्या माझ्या अंगा-खांद्यावर तेव्हा किती आनंद झाला होता म्हणून सांगू. वेगवेगळ्या ऋतूत नवीन रूपं घेणारी फुलं , झाडं , वेली , रंगीबेरंगी फुलपाखरं , पशू , पक्षी , बंधमुक्त होऊन खळाळणारे झरे. सगळं सगळं किती मोहक होतं. जंगलात बागडणा-या पशू पक्ष्यांच्या चिवचिवाटातून निर्माण होणाऱ्या नादलहरी , नदी- सागराच्या पाण्याचे माझ्या अंगावर पडणारे तुषार किती सुखद अनुभूती देऊन जात होते मला. अगदी आनंदलहरीत न्हात होते मी क्षणोक्षणी.   प्रत्येकाची आपापली निसर्ग नियमानुसार ठरलेली दिनचर्या , कोणी कोणीच्या अध्यात ना मध्यात. प्रत्येक जीवाला स्वत:ची अशी एक लय होती. जो तो आपापल्या मार्गात रममाण. मानवाने जन्म घेतला आणि मी अधिक सुखाची स्वप्न पाहू लागले. सारासार विचार करण्याची देणगी मिळाली होती त्याला. वाटलं तो नंदनवन करेल आता या जगाचं. खूप छान दिवस येतील. सगळे कसे गुण्या गोविंदाने , एकोप्याने नांदतील आणि तो परमे...