पॉकेटमनी
पॉकेटमनी आपल्या लहानपणी पॉकेटमनी हा शब्द फारसा ऐकिवात नव्हता. शाळा कॉलेजमध्ये मधल्या सुट्टीत लागणारा खाऊ आईने घरी केलेला असायचा आणि तो खाण्यातही खूपच आनंद होत असे. शाळेत येणे जाणे ही फारसे खर्चिक नव्हते. आता मात्र काळ बदलला आहे आणि मुलांना पॉकेटमनी दे णं गरजेचं झालं आहे. ब ऱ्या चदा मुलांच्या शाळा–कॉलेज दूर अंतरावर असतात स्पर्धेपायी असो , मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असो किंवा एखाद्या विषयातलं मुलाचं ज्ञान वाढवण्यासाठी असो. शाळे व्यतिरिक्त क्लासेस , चित्रकला , संगीत या सारख्या कलेची आवड असेल तर त्याचे वर्ग असे मिळून आजच्या मुलांची दिनचर्या अत्यंत व्यस्त झाली आहे. काही वेळा मुले घरापासून दूर हॉस्टेल मध्ये राहून शिकत असतात. घरी असली तरीही हल्ली मुलांचे दोन्ही पालक नोकरी निमित्ताने घराबाहेर असतात. अशा परिस्थितीत मुलांना पॉकेटमनी द्यावा की नाही हा प्रश्न गौण ठरतो. पॉकेटमनी द्यावाच लागतो. पण नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे पॉकेटमनी देताना पालकांनी काळजी घेणे नक्कीच गरजेचे आहे. कोणत्या वयापासून मुलांना पॉकेटमनी देण्यास सुरवात करावी या विषयी काही विशिष्ट नियम नाहीत पण पालकांनी सुर...